Koregaon-Bhima Victory Day : दरवर्षी एक जानेवारीला भीमा-कोरेगाव(Koregaon Bhima) विजय दिन साजरा केला जातो. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा या गावातील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी दाखल होतात. यंदाचा कोरेगाव भीमा 'शौर्य दिन वादात सापडला आहे. कोरेगाव भीमा 'शौर्य दिनावर बंदी घालण्याची मागणी करनी सेनेने(Karani sena) केली आहे. यामुळे आरपीआय(RPI) देखील आक्रमक झाली आहे.  कोरेगाव भीमा 'शौर्य दिना'ला करनी सेनेने विरोध केला आहे. यामुळे करनी सेना विरुद्ध आरपीआय आमनेसामने आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी 1 जानेवारीला साजरा होणाऱ्या शौर्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणी  करनी सेनेचे अजय सेंगर यांनी केली आहे. करनी सेनेच्या या मागणीनंतर आरपीआय देखील आक्रमक झाली आहे. सेंगर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केली आहे. 


पोलिसांचा तगडा बंदोबस्त 


पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी 205 वा शौर्यदिन साजरा होत आहे.  या अनुषंगाने प्रशासनाकडून विजयस्तंभ परिसरात सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा शौर्यदिन निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाला आहे. तर, येणारे अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहर पोलिस तसेच पुणे ग्रामीण पोलीसांकडून सर्व खबरदार घेतली जाणारा असून शुक्रवार पासूनच या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ही तैनात केला जाणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली. 


कोरेगाव भीमा शौर्य दिनाचा इतिहास


महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली ही एक ऐतिहासिक लढाई आहे.  1 जानेवारी,1818 मध्ये इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या सैन्यात ही लढाई  झाली होती. या लढाईत ब्रिटिशांनी विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्याकाळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे. यामुळेच दरवर्षी हा शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो. 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळं उसळलेल्या दंगलीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी कोरेगावात मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासूनच कोरेगाव भीमा शौर्य दिन वादात आहे.