आळंदी : कार्तिकी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो भाविक अलंकापूरीत दाखल झालेत. रविवारी नवमीनिमित्त माऊली मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सोमवारी दशमीनिमित्त माऊलींच्या मंदिरात श्रींना अभिषेक तसेच दुधारती करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापूजेनंतर दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा पार पडली.. किर्तन आणि प्रवचन, जागर अशा धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी भाविकांना लाभली. आज कार्तिकी एकादशी साजरी होत असून माऊलींच्या ७२२व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी राज्यभरातून भाविक आळंदीत दाखल झालेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख उपाययोजना करण्यात आलीये.


कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त आळंदीला जाण्यासाठी १२ ते १७ नोव्हेंबर दरम्यान राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशीच्या मुख्य दिवशी (१४ नोव्हेंबर) आळंदीची यात्रा आहे, तर १६ नोव्हेंबरला संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव आहे. या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने आळंदीला येतात. त्यांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.