मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde)   आणि करूणा शर्मा यांच्या नात्यामुळे महाराष्ट्रात राजकारण तापलं होतं. पण आता करूणा शर्मा यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 'धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक रांगेत उभे आहेत..आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे?' असं वक्तव्य करूणा शर्मा यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करूणा शर्मा यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी अनेक विषयांवर बोलल्या, त्या म्हणाल्या, 'सध्या सर्वत्र 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाबद्दल चर्चा रंगत आहे...'


'मोठे नेते देखील या विषयावर बोलताना दिसत आहेत. पण देशामध्ये शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा  असे अनेक प्रश्न आहेत. परंतु, या प्रश्नांवर कोण बोलत नाही. करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी तुरूंगात टाकलं. त्यावर कोणी बोलत नाहीत...'


त्या पुढे म्हणाल्या, 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाबद्दल बोलण्यापेक्षा दिशा सालीयन, पूजा चव्हाण यांच्यावर बोला. धनंजय मुंडे आज पाच-सहा मुलांचे वडील आहेत, तरी देखील राजकारणात कसे?' असं देखील करूणा शर्मा यावेळी म्हणाल्या.