कसाराघाट बनला मनमोहक निसर्गाचा वर्षाघाट
कसाराघाटचं दृष्य बदललं
नाशिक : नाशिक जिल्ह्याचं निसर्गसौंदर्य प्रवेशद्वार म्हणजे कसारा घाट. या घाटात पाऊस दाखल झाला की प्रवासही देखणा होतो. पावसात मुंबई-नाशिक रस्ता म्हटलं की सर्वांचा आवडता प्रवास असतो. पावसाळ्यात अतिशय प्रिय असा कसाराघाट आता वर्षाघाट बनलाय. सगळं कामधाम सोडून असं निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा मोह एकदा तरी या प्रवासात होतो. कधी कधी वाहनांच्या जंजाळात अडकलेल्या प्रवाशांसाठी इथलं निसर्गसौंदर्य म्हणजे क्षणभर विश्रांतीचं... अजून हा अनुभव घेतला नसेल तर कसारा घाटातून प्रवास एकदा कराच. खर्डी, कसारा, इगतपूरी, घोटी आणि नाशिक अशा प्रवासा दरम्यान डोंगर रांगा. दऱ्याखोऱ्या भोवतालचा मनमोहक निसर्ग अनुभवणं म्हणजे एक पर्वणीच असते. या घाटातील धुकं आणि प्रवासाची काही मनमोहक दृष्यं....