Kashedi Tunnel Progress: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कशेडी बोगद्यातून आता प्रवास सुखकर होणार आहे. कोकणात जाणाऱ्या लेनवरील बोगदा ऑगस्टअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळं प्रवाशांना आता विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. तसंच, गणेशोत्सवाच्या काळात हजारो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळं वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. मात्र, आता कशेडी घाटातील या बोगद्यामुळं प्रवास थोडा सुखकर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी येथील कोकणात जाणाऱ्या लेनवरील बोगदा ऑगस्‍टअखेर वाहतूकीसाठी खुला होणार आहे. त्‍यामुळे या बोगद्यातून चाकरमान्‍यांना प्रवास करता येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यात ये जा करण्‍यासाठी दोन स्‍वतंत्र बोगदे तयार करण्‍यात आले आहेत. एक बोगदा सध्‍या वाहतूकीसाठी सुरू असून दुसरा बोगदा ऑगस्‍ट अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्‍याचा राष्‍ट्रीय महामार्ग विभागाचा मानस आहे. 


कोकणातून मुंबईकडे जाणारा बोगदा सध्‍या दुहेरी वाहतूकीसाठी वापरला जात आहे. मात्र कोकणात जाणारया बोगद्याचे काम युदध पातळीवर सुरू आहे. काही कामं शिल्‍लक आहे. ती पूर्ण करून बोगदा ऑगस्‍ट महिन्‍यात सुरू केला जाईल, असं राष्‍ट्रीय महामार्ग वि भागाचे मुख्‍य अभियंता संतोष शेलार यांनी सांगितलं आहे.


कशेडी घाटातील बोगद्याला गळती


काही दिवसांपूर्वी कशेडी घाटातील बोगद्याला गळती लागल्याची चर्चा होती. ही गळती थांबवण्यासाठी महामार्ग विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. त्यासाठी आयआयटीच्‍या तज्ञांची मदत घेतली जात होती. त्‍यांच्‍या माध्‍यमातून पाहणी करून गळतीच्‍या कारणांचा शोध घेतला जात आहे. सध्‍या ग्राउटींग करून गळती थांबवण्यात आली होती. 


मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती केली आहे. त्यामुळं पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. कशेडी बोगद्यामुळं तळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बोगद्यामुळं कोकणात पोहोचणे सोयीचे होणार आहे. मात्र, कशेडी बोगद्यात अनेक ठिकाणी पाणी गळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं वाहन चालक धास्तावले आहेत.