KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत भरती, ग्रॅज्युएट ते MBBS सर्वांसाठी नोकरी, 60 हजारपर्यंत पगार
KDMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बंपर भरती सुरु आहे. या ठिकाणी पदवीधर ते एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतलेले सर्व उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच या विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 17 हजार ते 60 हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.
KDMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बंपर भरती सुरु आहे. या ठिकाणी पदवीधर ते एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतलेले सर्व उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच या विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 17 हजार ते 60 हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 64 रिक्च जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणारे उमेदवार ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवू शकतात.
केडीएमसीमध्ये 'पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीच्या एकूण 21 जागा, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीच्या 17 जागा, स्टाफ नर्स (पुरुष) च्या 3 जागा, ANMच्या 6 जागा, फार्मासिस्टच्या 12 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, टीबी हेल्थ व्हिजिटर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ थुंकीचे सूक्ष्मदर्शक’ची प्रत्येकी 1 जागा भरली जाणार आहे.
अर्जाची छाननी करुन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. उमेदवारांना आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हाल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट या पदांसाठी उमेदवारांना 8 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर इतर पदांसाठी उमेदवार 2 ऑगस्ट ते 04 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर अर्जाचा नमुना देण्यात आला आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण (प.) पिन – 421301 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
दहावी उत्तीर्णांना सीम पोलीस दलात नोकरी, 69 हजारपर्यंत मिळेल पगार
दहावी उत्तीर्ण असून चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दहावी उत्तीर्ण तरुणांना आता चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसोबत देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात भटकत असाल, तर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) चा भाग होण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आटीबीपीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
आयटीबीपीमध्ये सामील होण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ITBP कॉन्स्टेबल भरती 2023 मोहिमेंतर्गत, एकूण 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) ग्रुप सी नॉन-राजपत्रित (नॉन-मंत्रालयीन) पदांसाठी संस्थेमध्ये (ITBP भर्ती) भरती केली जाणार आहे.
या पदभरतीच्या अखेरीस निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्समधील स्तर-3 अंतर्गत 21700 ते 69100 रुपये पगार दिला जाार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार हा पगार दिला जाणार आहे.