कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार
KDMC Bharti 2023: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला आणि पुरुष पदे भरली जाणार आहेत.
KDMC Bharti 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केडीएमसीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी एमबीबीएमस उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 60 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
स्टाफ नर्स महिलांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा. त्याने जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
स्टाफ नर्स पुरुषच्या 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा. त्याने जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
दूरसंचार विभागात विविध पदांची भरती, मुंबईत मिळेल भरघोस पगाराची नोकरी
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला आणि पुरुष पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 70 वर्षापर्यंत असावे. निवड झालेल्या उमेदवारांना कल्याण-डोंबिवली येथे काम करावे लागणार आहे.
उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून थेट मुलाखतीद्वारे ही निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत आणून द्यावेत.
त्याच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
Bank Job: एक्झिम बँकेत विविध पदांची भरती, 63 हजारपर्यंत मिळेल पगार
उमेदवारांनी आपल्या अर्जासह आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.