जालना : लॉकडाऊनसाठी मानसिकता तयार ठेवा, तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. जालना महाराष्ट्राला दररोज 6 लाख लसींची पूर्तता झाल्यावर राज्याचा वेग वाढवता येईल असेही ते म्हणाले. जालन्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विद्युत शव दाहिनी प्रत्येक जिल्ह्यात निर्माण करण्याबरोबरच ऑक्सिजन प्लांट तातडीने उभारणे, रेमडिसीवीर वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येण्याबाबत निंर्णय झाल्याची माहिती टोपे यांनी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीं मिळत नाही याची आम्हाला खंत आहे असंही ते यावेळी म्हणाले. यापुढे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट तयार होणार असून त्यातूनच ऑक्सिजनची गरज भागवली जाईल असंही त्यांनी सांगितलं.10 वी आणि 12 वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जीव वाचवण्यासाठी असे निंर्णय घ्यावे लागतात असं सांगत त्यांनी या निंर्णयाच स्वागत केलं.



लॉकडाऊन काळात गोरगरीब नागरीकांना मदत करण्यासाठी चर्चा झाली असून मुख्यमंत्री याबाबतीत अंतिम निंर्णय घेतील असंही टोपे यांनी सांगितलं.सध्या अनेक जिल्ह्यात बेडची कमतरता असून याबाबतीत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना बेडस,ऑक्सिजन बेड्स वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यापुढे कमतरता असल्याची सबब चालणार नाही असा इशाराही टोपे यांनी दिला.