केतकी चितळेने महाराजांवरची `ती` पोस्ट का डिलीट केली? काय लिहलं होतं पोस्टमध्ये?
Ketaki Chitale Post : दरम्यान महाराजांसंदर्भातली अशी पोस्ट करून तिने नंतर ती डिलीट केली होती. मात्र तरीही काहिंनी तिच्या पोस्टचा स्क्रिनशॉट काढत व्हायरल केला आहे. या तिच्या नवीन पोस्टवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.
Ketaki Chitale Post : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नेहमी तिच्या परखड वक्तव्यामुळे चर्चेत असते. या तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. मध्यंतरी तिने राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यामुळे ती अडचणीत सापडली होती. त्यानंतर आता तिने आणखीण एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे.
केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होता, तसेच महाराजांच्या मावळ्यावर सडकून टिका करण्यात आली होती. ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिने ती डिलीट केली होती.मात्र पोस्ट डिलीट केल्यानंतरही ती चर्चेत आली आहे.
पोस्टमध्ये काय?
“समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्याचा विचार का आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. सनातन धर्माला मारणे ते ही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश आहे केतकीने (Ketaki Chitale) तिच्या पोस्टमध्ये म्हटलेय.
स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्याने काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो, त्याचा अपमानही) लावून तयार असतातच” , असं केतकीने (Ketaki Chitale) पोस्टमध्ये म्हटलंय.
“एक मेसेज मिळताच किक मारुन अशुद्ध मराठीत (महाराजांना सहा भाषा अस्खलित येत असत. इकडे मातृ-पितृ भाषेची बोंब असो) आरडाओरडा सुरू. सनातनी हिंदू मारला जात आहे. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत. आणि सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे, असल्याचे केतकी (Ketaki Chitale) पुढे म्हणते.
“चार पैश्यात घोषणा करा. जातीयवाद निर्माण करा. सनातनी हिंदू झोपला आहे, याचा फायदा घ्या. जे जागे आहेत त्यांना तुरुंगात टाका व केसेस ठोका. पण लक्षात असू द्या…झोपलेला जेव्हा जागा होतो तेव्हा तो पेटून उठतो”, असंही केतकीने (Ketaki Chitale) म्हटले.
दरम्यान महाराजांसंदर्भातली अशी पोस्ट करून तिने नंतर ती डिलीट केली होती. मात्र तरीही काहिंनी तिच्या पोस्टचा स्क्रिनशॉट काढत व्हायरल केला आहे. या तिच्या नवीन पोस्टवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.