पुणे : ही बातमी आहे एका १३ वर्षांच्या मुलाच्या बहादुरीची... पुण्यातील एका १३ वर्षीय मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुखरुप सुटका करून घेण्यात यश मिळवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुरहान नुद्दिन असं या १३ वर्षांच्या मुलाचं नाव आहे. बुरहान नुद्दिन हा पुण्याच्या फोंडवाडा परिसरात राहतो. आईच्या सांगण्यावरून १६ जुलै रोजी तो आपल्या भावासोबत घराजवळच काही समान आण्यासाठी गेला होता. इतक्यात दोन इसमांनी बुरहानला रिक्षात घालून पुणे रेल्वे स्थानकात घेऊन आले.


मात्र, बुरहानने त्या अपहरणकर्त्यांची नजर चुकवून पळ काढाला. घाबरलेला बुरहान थेट पुणे–जोधपूर या ट्रेनमध्ये जाऊन लपून बसला.


ट्रेनमधील एका इसमाने त्याची विचारपूस केली. बुरहानने त्या इसमाच्या मदतीने आपल्या वडिलांना फोन लावला. त्यानंतर बुरहानच्या वडिलांनी त्याला वसईला उतरवण्यास सागितलं आणि वसईतील आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना फोन करून बुरहानला ताब्यात घेण्यास सागितलं. अखेर नातेवाईक सैफी यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतलं.