मुंबई : दिवाळी म्हटलं की दिवे, आकाशकंदील, फराळ, पणत्या, रोषणाई हे सारं आलंच. त्याचबरोबर दिवाळीत किल्ले बनवण्याचीही जुनी परंपरा आहे. दिवाळीची सुट्टी लागताच बच्चे कंपनी किल्ल्यांच्या कामाला लागते. मात्र हल्ली वाढत चाललेले शहरीकरण, सोसायटी संस्कृती यामुळे ही परंपरा मागे पडत चाललीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिवंडीत मात्र ही परंपरा कायम आहे. भिवंडीच्या ध्येय स्फूर्ती प्रतिष्ठान, शेलार तर्फे दरवर्षी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात येते.  या स्पर्धेत विविध प्रकारचे किल्ले साकारले जातात. जेणेकरुन येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख व्हावी. त्यांच्या कार्याची माहिती मिळावी. 


अनेकांना शिवाजी महाराजांच्या रायगड, प्रतापगड, राजगड, शिवनेरी ही आणि अशी काही मोजकीच किल्ल्यांची नावे माहीत आहेत. मात्र या स्पर्धेद्वारे अनेक माहीत नसलेल्या किल्ल्यांचीही ओळख होते.