Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्याकडे 8 तासांच्या क्लिप असून त्या सभापतींना पाठवणार आहे. यामध्ये मराठी भगिनींचं एक्स्टॉर्शन झाले आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे. भाजपा संस्कृतीच्या गप्पा मारते. या प्रकरणात काही महिलांनी महिनाभरापूर्वीच आमच्याशी संपर्क केला आहे. या सगळ्या महिला येणाऱ्या काळात किरीट सोमय्यांचे वेगवेगळी प्रकरणं समोर आणतील, असेही दानवे यावेळी म्हणाले.कुणाच्याही राजकीय जीवनातील बदनामीमुळे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झालं, तर तो राजकारणाचा भाग आहे. पण एखाद्याचं खासगी आयुष्य उद्ध्वस्त होतं, एखाद्याच्या कुटुंबावर प्रसंग येतो हा अनुभव आम्ही घेतला असल्याचेही दानवे यावेळी म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेत गेल्या काही वर्षे बरेच पेनड्राईव्ह बॉम्ब फुटले. आज हा पेनड्राईव्ह बॉम्ब विधानपरिषदेत आला आहे. एका वृत्तवाहिनीवर भाजपाच्या एका माजी खासदाराचा एक व्हिडीओ प्रसारित झाला आणि तो व्हायरल झाला असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. दरम्यान किरीट सोमय्या यांची केंद्राने दिलेली सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी आमदार अनिल परब यांनी केली आहे.


दरम्यान या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी माहिती यांनी दिली. तक्रारी आल्या असतील तर तशी माहिती द्या, पोलीस त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील, असे फडणवीस म्हणाले. 


भाजप नेते  सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे. मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत. असे या पत्रात लिहिले आहे.


माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही असे किरीट सोमय्या यांनी पत्रात लिहिले आहे. अशा सर्व आरोपांची व्हिडिओ क्लिप/क्लिप्स सत्यता तपासावी, चौकशीही करावी, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे. 


किरीट सोमय्यांच्या कथित वादग्रस्त क्लिपवरून आता विरोधक आक्रमक झालेत. स्वतःच लावलेल्या आगीत सोमय्या होरपळले असा टोला काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोलेंनी लगावला, तर गृहमंत्री फडणवीसांकडून न्यायाची अपेक्षा नाही, ते क्लिनचीट देतील अशी टीका भास्कर जाधवांनी केली. हमाम मे सब नंगे होते है हे आरोप करणा-यांनी लक्षात ठेवावं असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला.


वादग्रस्त कथित व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीय. आपण कोणावरही अत्याचार केलेला नाही असं त्यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पोलीस आयुक्त फणसळकर यांना पत्र लिहीत त्यांनी ही मागणी केलीय.