विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : दिवसोंदिवस मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहे, चोरीला गेलेल्या मोबाईलच्या गैरवापराचीही अनेकांना भिती वाटते, मात्र हाच सगळा प्रकार टाळण्यासाठी आता सरकारनंच नवी उपाययोजना केली आहे, आता तुमचा मोबाईल चोरीला गेला तरी सुद्धा तो कुणीही वापरू शकणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल हरवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये तर दिवसाला शेकडो मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये येत असतात. हरवलेले मोबाईल शोधणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान असतं. शिवाय ज्याचा मोबाईल हरवलाय त्याच्यासाठी मोबाईल म्हणजे सर्वस्व हरवण्यासारखं असतं. चोरीला गेलेल्या मोबाईलची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेच्या मुळावरच सरकारच्या CEIRनं घाव घातलाय. CEIR म्हणजे  सेंट्रल इक्वीपमेंट आय़डेंटीटी रजीस्टर सिस्टिम.


मोबाईल हरवल्यानंतर तुम्ही मोबाईल आयएमईआय नंबर रजिस्टर केल्यास चोरलेला मोबाईल ट्रॅक करता येऊ शकतो. शिवाय तुम्ही सिमकार्डही ब्लॉक करु शकता. चोरीच्या मोबाईलमध्ये दुसरा सिम टाकल्यास पोलिसांना आणि तुम्हाला त्याची माहिती मिळते. चोरट्यानं काहीही केलं तरी तो स्वतःला लपवू शकणार नाही. 


चोरलेला मोबाईलच ब्लॉक झाल्यास तो पुन्हा विकता येणार नाही. या वेबसाईटचा जास्त वापर झाल्यास मोबाईल चोरीचं प्रमाण आपोआप कमी होईल असा विश्वास पोलिसांना आहे. 


पर्सनल वॉलेट, पर्सनल पीसीचं काम करणारा मोबाईल तुमच्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. तो हरवणार नाही याची काळजी घ्या. आणि हरवलाच तर CEIR वेबसाईटवरुन चोरलेल्या मोबाईलचा आणि चोराचा माग काढा.