मुंबई : कर्जत तालुक्यातील कोदिवले गावातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला आधुनिक तंत्रज्ञानाची भेट दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरूणांनी तरुणांनी पुढाकार घेत स्वखर्चानं आपली शाळा डिजीटल केलीये.. त्यामुळे आता या शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळणार आहे.. शाळेतील संगणक आणि इ लर्निंग ची साधने पाहून सर्व चिंमुरड्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणीत झालाय..


कर्जत तालुक्यात अनेक ग्रामीण भागात डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. त्यामुळे कोदिवले शाळेतही विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे असे येथील शिक्षकांना वाटत होते. यासाठी शासन व्यवस्था आणि लोकप्रतिनीधींच्या आशेवर न राहता गावातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत बालदिनाच्या दिवशी शाळेला ही अनोखी भेट दिली..