रत्नागिरी : कोकण वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिमगा, गणपतीला कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या पाहता कोकण रेल्वेचे दुपदरीकरण व्हावे, रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी वारंवार होत होती. पण आता रेल्वेने याकडे लक्ष दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सामना'ने दिलेल्या वृत्तानुसार, या रेल्वे मार्गावर २१ नव्या स्थानकांची निर्मिती करण्याची योजना रेल्वेने आखली आहे.  या मार्गादरम्यान दुपदरीकरणाद्वारे १५० किमी. मार्गाचे दुपदरीकरण केले जाणार आहे. यामुळे कोकणात जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
 या दुपदरीकरणासाठी ज्यांच्या जमीन जाणार आहेत त्या जमीन मालकांना नव्या नियमाप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे. मात्र आमच्या योजनेसाठी खूप कमी प्रमाणात भूसंपादन करावे लागेल, असे संजय गुप्ता यांनी यावेळी सांगितले.


पाच हजार कोटींचा निधी


एवढ्या मोठ्या स्तरावर होत असलेल्य कामासाठी निधी उपलब्ध होत असून कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  दुपदरीकरणासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावीत असल्याची माहिती रेल्वेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली आहे.