पाहा, सीसीटीव्ही व्हिडिओ, एका सेकंदात १३ जणांचं परिवार कसं संपून गेलं...
पंचगंगा नदीवरील पुलावरून ट्रॅव्हलर मिनी बस कशी कोसळली, ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासकडे आलं आहे, पंचगंगा नदीवरील पुलावरून ट्रॅव्हलर मिनी बस कशी कोसळली, ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय...
पुलावर अचानक पुल संपण्याआधी संबंधित वाहनाच्या ड्रायव्हरने टर्न घेतल्यामुळे, ही मिनी बस नदीपात्रात कोसळली आहे. ड्रायव्हरला डुलकी आल्याने हे झाले किंवा कुठे टर्न घ्यायचा आहे, याचा नेमका अंदाज आला नाही, यामुळे हा अपघात घडला हे अजून स्पष्ट होवू शकलेलं नाही.
नदीपात्रात कशी कोसळली बस
मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये बस नदीपात्रात कोसळताना स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडीओ जनजागृतीसाठी महत्वाचा ठरणार आहे, कारण एक डुलकी किंवा ड्रायव्हिंग करताना उगाच केलेला अंदाज खोटा ठरला तर, एक आख्ख परिवार संपून जातं हे यावरून दिसून येत. या अपघातात एकाच परिवारातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
एका क्षणात आख्ख परिवार संपून गेलं
गणपतीपुळे येथून पुण्याकडे परतत असताना शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यात शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.