Kolhapur Ambabai temple News : साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाचं शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई...जगतजननी अशी ओळख असलेल्या आईला कुणी वाली आहे की नाही? असा सवाल आता निर्माण झालाय. कारण अंबाबाईच्या मूर्तीची (Kolhapur News) सातत्यानं झीज होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मूर्ती अभ्यासकांकडून केला जातो. झी 24 तास इन्व्हेस्टीगेशमध्ये मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. (Kolhapur ambabai mandir Deterioration of Ambabai idol exclusive news zee 24 taas video)



मूग गिळून गप्प बसायचं का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबाबाईच्या मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धन केल्यानं मूर्तीचं रूप बदलल्याचा आरोप त्यांनी केलाय. देवीच्या बोटांची झीज झालीय. चेह-यावरील भाव बदलले गेले आहेत. इतकंच नाही तर मूर्तीवरील अलंकार, कलाकुसर अस्पष्ट झाल्याचा गंभीर आरोपही मालेकर यांनी केलाय. एव्हढं सगळं होत असतानाही या सगळ्याकडे दुर्लक्ष होतंय, अशा परिस्थितीत भक्तांच्या मनाला क्लेश होत असतानाही त्यांनी मूग गिळून गप्प बसायचं का? असा सवालही यानिमित्तानं मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर यांनी केलाय... 


काय म्हणाले मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर पाहा 



कितीवेळा संवर्धन करणार?


दोन वर्षांपूर्वी अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. पण ती प्रक्रिया कुचकामी ठरली का काय? असा सवाल आता भक्त विचारत आहेत.