कोल्हापूर : Kolhapur Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमधील धुसफूस चव्हाटयावर आली आहे. दरम्यान, आमदार विनय कोरे यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. सत्तारुढ गटातील नेते प्रामाणिक राहिले असते तर विरोधी गटातील एकही जागा निवडणून आली नसती, असा दावा विनय कोरे (Vinay Kore) यांनी केला आहे. (Kolhapur Bank Election: Vinay Kore's direct warning ruling alliance leaders)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचा विजय सुद्धा विनय कोरे यांच्या जिव्हारी  लागला आहे. सर्वजण एकत्र यावे अशी अपेक्षा होती; मात्र माझ्या अपेक्षांना विश्वासघाताने सुरुंग लावला गेला, असा हल्लाबोल विनय कोरे यांनी गेला आहे. ज्यांनी हे विश्वासघाताचे पाप केले त्यांना त्याची योग्य वेळी किंमत मोजावी लागले, असा इशारा सत्ताधारी गटातील नेत्यांना दिला आहे.


कोणाला किती जागा मिळाल्यात


कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 21  जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 17 जागा जिंकत सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने आपले वर्चस्व पुन्हा कायम राखले आहे. खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन विकास विरोधी आघाडीला तीन  तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.



जिल्हा बँकेच्या 21 जागांपैकी सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या 6 जागा यापूर्वीच निवडून आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात राजर्षी शाहू विकास आघाडीने 11 जागा जिंकत बाजी मारली.


यांनी बाजी मारली


सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक हे सहा जण बिनविरोध म्हणून या आधीच निवडून आले आहेत. तर आज, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजू आवळे, आमदार विनय कोरे, सुधीर देसाई, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, भैया माने, स्मिता गवळी, निवेदिता माने, श्रुतिका काटकर, विजयसिंह माने उमेदवार निवडून आले आहेत.