Kolhapur Black Magic: काळी जादू, वशीकरण, नरबळी, जादूटोणा या सर्व घटनांना काहीसा चाप बसत नाही तोच राज्याला पुन्हा हादरा देणारी बातमी समोर आली आहे. शाहू महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रात (Maharashtra news ) हा प्रकार घडल्यामुळं ही घटना प्रशासन आणि यंत्रणेलाही खडबडून जाग आणत आहे. सध्याच्या घडीला परिस्थिती इतकी वाईट आहे, की कोल्हापुरातील (Kolhapur) पाडळी खुर्द गावातील मुलींना घराबाहेर पडण्यासही धास्ती वाटू लागली आहे. इतकंच काय, तर या मुलींची शाळा बंद होते काय असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठे घडला हा प्रकार? 


शाहूंच्या पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार समोर आला आहे. परडीत मुलींचा फोटो ठेऊन त्यावर हळद कुंकू, लिंबूला टोचलेल्या टाचण्या, हिरवं कापड असा उतारा ठेवल्याचा धक्कादायक घडल्याचं पाहायला मिळालं. बालिंगा-पाडळी रस्त्यावर हा जादूटोण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. हा अघोरी प्रकार कुणी केला...? याचा तपास आता पोलीस करत आहेत. पण, वशीकरणासाठी करण्यात आलेल्या या काळ्या जादूच्या घटनेमुळे आता पाडळी खुर्द या गावातील मुलींना धडकी भरली आहे. 


दरम्यान, महाराष्ट्राच्या ज्या भागात ही घटना घडली त्याच कोल्हापूरातून काही रुढींना शह दिला गेला. त्याच कोल्हापूरातून समाजपरिवर्तनाची सुरुवात आणि आंदोलनंही झालं. पण, आज 21 व्या शतकात मात्र कोल्हापूरात घडलेली वशीकरणाची घटना आपली मानसिकता कुठे चाललीये हाच प्रश्न उपस्थित करु लागली आहे. 


हेसुद्धा वाचा : गॅसचे तुकडे 400 मीटर पर्यंत उडाले; डोळ्यासमोर संसाराच्या चिंधड्या झाल्या


सदर घटनेमुळं गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी पावलं उचलण्याचा निर्णयही घेतला आहे. इतकंच नव्हे, तर गावातील रस्त्यांवरर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा प्रस्तावही पुढे करण्यात आला आहे.