प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून बाहेर पडलेल्या तरुणाचा सिमेंट पाईप डोक्यात घालून निर्घृण खून (Crime News) केल्याची घटना कोल्हापूर (kolhapur News) शहरातील उचगाव मध्ये घडली आहे. पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गात (pune bangalore national highway) लगत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना (kolhapur Police) यश आले आहे. तरुणाच्या खूनाप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश नामदेव संकपाळ (राहणार गणेश कॉलनी उचगाव ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. हा खून केवळ दोनशे रुपयांच्या पानटपरीच्या उधारीवरून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गणेश हा एका फर्निचर दुकानात काम करत होता. बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास गणेश संकपाळ हा डॉक्टरांकडे जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला होता. पण त्यानंतर मात्र तो घरी परतलाच नाही. 


गणेश राहत असणाऱ्या परिसरात संशयित आरोपी विकी जगदाळे याची पानपट्टी आहे. गणेश या पानपट्टीत जाऊन उधारीवर सिगरेटचे पाकीट घेत होता. पण वारंवार उधारी मागून देखील तो देत नसल्याचे पाहून संशयित आरोपी विकी त्याच्या साथीदारांसोबत उधारी वसूल करण्यासाठी त्याच्याकडे गेला होता. यावेळी पैशांवरून दोघात जोरदार वादावादी झाली. या वादवादीचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यावेळी मृत गणेश संकपाळ याच्या पाठीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यानंतर डोक्यात सिमेंटचा पाईप घालत गणेश संकपाळची निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.


पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गात लगत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात गणेशाचा रक्ताने माखलेला मृतदेह तिथून जात असलेल्या व्यक्तीच्या नजरेस आला होता. याची माहिती गांधीनगर पोलिसांना समजतात गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गणेश संकपाळ यांच्या पाठीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात सिमेंटचा पाईप घालत खून केल्याचे समोर आले. गांधीनगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या तीन तासाच्या आत संशयिताना ताब्यात घेतलं. यामध्ये संशयित आरोपी पानपट्टी चालक विकी जगदाळे ( वय वर्ष 20, रा. चपाले गल्ली ) करण राजेंद्र पुरी ( वय वर्ष 23, रा. रेसकोर्स नाका संभाजीनगर) रतनकुमार रमेश राठोड ( वय वर्ष 20 ) ओम गणेश माने (वय वर्ष 21 तिघेही रा. उचगाव) रोहन गब्बर कांबळे (वय वर्ष 20, रा. टेंबलाई नाका रेल्वे फाटक ) अशा पाच जणांचा समावेश आहे. 5 संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतल. आहे