कोल्हापूर : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. गोकुळकडून गायीच्या दुधाच्या खरेदीत दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर म्हैशीच्या दुधाच्या खरेदीत १.७० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ फेब्रुवारीपासून नवीन दरानुसार दुधाची खरेदी केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकूळ) संघाने या दरवाढीचे परिपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत आले आहे. गायी दूध दरामध्‍ये ३.५ फॅट आणि ८.५ एस.एन.एफ करिता प्रतिलिटर दोन रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्‍यामुळे गाय दूध दर २७ रूपये वरून आता २९ रूपये इतका होणार आहे.



तसेच म्‍हैशीच्या दूध खरेदी दरामध्‍ये ७.० फॅट आणि ९.० एस.एन.एफ करिता एक रूपये सत्‍तर पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे म्‍हैस दूध खरेदी दर ४२. ३० पैसे वरून ४४ रुपये इतका होणार आहे.