COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर: गोकुळ दूध उत्पादक संघाने गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची आजपासून (२० जून) अमलबजावणी करन्याचा निर्णय घेण्यात आलाय. गाईच दूधाचं अतिरिक्त उत्पादन झाल्याने दूधच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निर्णयामुळे गाय दूध खरेदी दर २५ रुपयांवरुन २३ रुपयांवर आलाय.


दूध उत्पादकांना तोटा


सरकारने जाहीर केलेल्या दूध दरापेक्षा दूध उत्पादकांना प्रति लिटर ४ रुपये तोटा सहन करावा लागणार आहे. तर, विक्री दरात देखील केली कपात करण्यात आली आहे. गाईचे दूध ४४ रुपये लिटरनं ग्राहाकाला खरेदी करावं लागत होतं. आता मात्र हे दूध ४२ रुपये दराने मिळणार आहे.


दूध उत्पादकांमध्ये संताप


दरम्यान, निर्णय ग्राहकांना दिलासा देणारा असला तरी, गाय दूध उत्पादक शेतकऱ्याचं मात्र कंबरडे मोडणार निर्णय आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादक चांगलेच संतापलेत.