गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांची अडवणूक, खरेदी दूध दरात दोन रुपयांची कपात
गोकुळच्या गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे.
कोल्हापूर : गोकुळच्या गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. संकलित केलेल्या दूधाची विक्री होत नसल्याने खरेदी दर दोन रुपयाने कमी करण्याचा गोकुळ दूध संघाने निर्णय घेतला आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. गोकुळच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात केल्याने २९ रुपयांचे गाईचे दूध आत्ता २७ रुपये लिटरने खरेदी केले जाणार आहे. असे असले तरी बाजारभाव काय ठेवण्यात याला आहे. केवळ शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा निर्णय गोकुळ दूध संघाने घेतला आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
राज्य सरकारने दूध खरेदीचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य सरकारच्यावतीने जाहीरही करण्यात आले आहे. असे असताना गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांच्या अडणीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, दुधाची उचल होत नसल्याचे कारण देत गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याच्या दुधाचा दर दोन रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे गोकुळच्या गाय दूध खरेदी दारात दोन रुपयांची कपात केली आहे.
संकलित दूधाची विक्री होत नसल्याने खरेदी दर दोन रुपयाने कमी करण्याचा गोकुळ दूध संघाचा निर्णय असला तरी ग्राहकाला याचा काहीही लाभ झालेला नाही. तसेच दूध विक्री दारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही गोकुळ दूध संघाने स्पष्ट केला आहे. तसेच दुधाची उचल होत नसल्याने संघाला दुधाची पावडर करण्यासाठी लिटर मागे अडीच रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. हा दररोजचा तोटा भरून काढण्यासाठी गोकुळ दूध संघाचा निर्णय असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या तोट्याचे काय, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.