मुंबई : महाराष्ट्र विकासआघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने पालकमंत्री जाहीर केले होते. मात्र, या पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नकार दिला होता. त्याऐवजी सत्तेज पाटील यांनी नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यामुळे तिढा वाढला होता. तसेच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनाही पालकमंत्री पद देण्याची मागणी करण्यात आली होती. आता दोघांनाही पालकमंत्री पदे देण्यात आली आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर अखेर या पदावर सतेज पाटील यांची वर्णी लागली. तर सांगलीचे विश्वजित कदम यांना भंडारा जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.