कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पुजारी हटाव आंदोलन सुरू असतानाच आता पुन्हा एक नवा वाद निर्माण झालाय. मंदिरातले पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यात हा वाद आहे.


नेमके वादाचे कारण काय ? 


अंबाबाई मंदिरातल्या मुख्य गाभा-यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. या कॅमे-यांना पुजा-यांनी विरोध केलाय आणि हे कॅमेरे बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. शिवाय गाभा-यावर आमचा मालकी हक्क असल्याचं निवेदन देवस्थान समितीला देत देवस्थान समितीने बेकायदेशीररित्या हे कृत्य केल्याचा आरोप पुजा-यांनी केलाय.


महालक्ष्मी मंदिरातील पुजार्‍यांनी विरोध केला असला तरीही देवस्थान समितीनेही आक्रमक भूमिका घेत कॅमेरे तसेच राहतील ही भूमिका घेतलीय. तसेच कॅमेरा बंद केल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पुजा-यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.