कोल्हापूर : शहरातील उद्योगपती आणि काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (congress mla chandrakant jadhav ) यांचे आज हैदराबाद इथे उपचार सुरू असताना निधन झाले. ( MLA Chandrakant Jadhav passes away) आज दुपारी एक वाजेपर्यंत चंद्रकांत जाधव यांचा पार्थिव कोल्हापुरात ( Kolhapur) आणण्यात येणार आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून ते पाहिल्यांदाच निवडून आले होते. कोल्हापूरातील मोठे उद्योगपती म्हणून चंद्रकांत जाधव याची ओळख होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत जाधव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या आठ दिवसांपासून चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते. 


आमदार चंद्रकांत जाधव यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांना त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता. त्यावर स्थानिक रुग्णालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने हैदराबाद येथे हलविण्यात आले.  उपचारांदरम्यान रक्तदाब कमी झाल्याने त्यांचे निधन झाले.



त्यांची ओळख उद्योगपती अशी होती. चंद्रकांत जाधव यांचे जाधव इंडस्ट्रिज, प्रेमला पिक्चर्स, जाधव टूल्स, जाधव बेवरेजेस, जाधव मेटल्स, प्रेमला इंडस्ट्रिज असे उद्योग आहेत. उद्योग क्षेत्रात त्यांनी मोठा लौकिक मिळवला होता.