Kohlapur Shahu Maharaj Video : कोल्हापूरमधील राजघराणं अशी ओळख असणाऱ्या आणि छत्रपतींचे वारस म्हणून जगभरात ख्याती असणाऱ्या शाहू महाराज छत्रपती यांच्या कुटुंबाविषयी पक्त कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला आपुलकी आहे. संभाजीराजे असो किंना खुद्द शाहू महाराज. छत्रपती घराण्यातील व्यक्ती समोर आली की मान आदरानं झुकतेच. याच कुटुंबाचे प्रमुख आणि नवनियुक्त खासदार शाहू महाराज यांनी नुकतीच विशाळगड परिसराला भेट दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहू महाराजांची ही भेच जितकी संवेदशनशील होती तितकीच ती खासही ठरली. कारण, राजे आले आणि राजांनी मोठ्या आपुलकीनं विशाळगड परिसरातील गजापूर गावात असणाऱ्या प्रभावित क्षेत्राला भेट देत तेथील स्थानिकांची विचारपूस केली. गावाची पाहणी करत स्थानिकांना आलेल्या अडचणी आणि त्यांच्यापुढं उभ्या राहिलेल्या प्रसंगाविषयी शाहू महाराजांनी आपुलकीनं चौकशी केली. 


रयतेचा राजा, असा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो तेव्हातेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराजांची आठवण होते आणि या छत्रपती घराण्याचा वारसा मिळालेल्या शाहू छत्रपती यांच्या एका कृतीतूनही हेच सिद्ध झालं. गजापूर इथं स्थानिकांशी संवाद साधताना तिथं काही महिला आणि लहानगेही उपस्थित होते. यावेळी पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. सततच्या पावसामुळं गावातील वातावरणात गारवा पसरला होता आणि पावसाच्या धारा अंगावर झेलत, थंडी वाजत असतानाही त्या गर्दीत उभी असणारी एक चिमुरडी छत्रपतींच्या नजरेस पडली. 



हेसुद्धा वाचा : Ashadhi Ekadashi 2024 : कशी होते मानाच्या वारकऱ्यांची निवड?साक्षात विठ्ठलाची महापूजा करण्याचा मिळतो मान


पावसात भिजणाऱ्या लहान मंडळींमधीयल या मुलांचं म्हणणं ऐकतानाच थंडीनं गारठलेल्या एका चिमुरडीला पाहून छत्रपतींनी क्षणाचाही विचार न करता स्वत:चं जॅकेट काढलं आणि ते तिला घालण्यास सांगितलं. तितक्यातच तिथं फोटो काढण्यासाठी उपस्थितांची गडबड झाली. पण, 'फोटो नको... आधी तिला जॅकेट घाला...' असं म्हणत शाहू महाराजांनी आपली काळजी व्यक्त केली. त्यांच्या या कृतीनं गावकऱ्यांचं मन भरून आलं. आपला आधारच इतका भक्कम असताना त्यांना इतर आव्हानं लगान वाटू लागली आणि पुन्हा एकदा राजांनी रयतेचं मन जिंकलं.