कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवडीमध्ये वनाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची बातमी 'झी मीडिया'नं पुरावण्यानिशी दाखवली.


चौकशी आणि केविलवाणा प्रयत्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर राज्यातील वनखात खडबडून जागं झालं. त्यामुळं कोल्हापूर वनक्षेत्रातील मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांना चौकशी अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी लावली. 


एकीकडं हा चौकशीचा फार्स केल्याचं अधिकारी दाखवत होते, पण दुसरीकडं चौकशी अधिकारी जागेवर पोहचायच्या आत भ्रष्टाचारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपला भ्रष्टाचार लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 


कारवाईचा फार्स 


'झी मीडिया'नं हाही प्रयत्न हाणून पाडला. चौकशी अधिकारी येण्या-अगोदरच अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळं या चौकशीबाबात प्रश्न चिन्ह निर्माण झाला. त्यामुळ अखेर मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील याबाबत दखल घेऊन, करवीरचे वनक्षेत्रपाल विश्वजीत जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं लागलं.


वनाधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?
पण याच मुख्य वनसंरक्षकांनी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांना मात्र अद्याप सक्तीच्या रजेवर पाठविलेलं नाही. त्यामुळं सांगली आणि साता-यामध्ये पारदर्शक चौकशी होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.