मुंबई : गोव्याच्या डॉपलर रडार प्रतिमा आणि उपग्रह प्रतिमा, कोकण व घाट भागात दाट ढग दर्शवत आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात घाट भागात (सातारा, पुणे) अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पूर परिस्थितीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीवनावश्यक साहित्य मिळवण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील जांभळी परिसरातील लोकांची धडपड सुरू आहे. कमरे एवढया पाण्यातून दूध आणि इतर साहित्यांची वाहतूक केली जात आहे. जांभळी खोऱ्याला बेटाच स्वरूप आले आहे. नागरिक हैराण झाले आहेत. गेल्यावर्षी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. 



दोन दिवसांपासून पावसाने झोडपण्यास सुरुवात केल्याने कोल्हापूर जिल्हा महापुराच्या विळख्यात सापडण्याची चिन्हे आहेत. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने महापुराचा धोका अधिकच वाढला आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून शंभरावर बंधारे पाण्याखाली गेली आहेत. अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.