COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर : आता कोल्हापुरातली एक थरारक घटना... कोल्हापुरातल्या राजारामपुरीत बंदुकीचा धाक दाखवून सव्वा तोळ्याची सोनसाखळी लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. भरदिवसा रस्त्यावर चोरीचा हा थरार पाहायला मिळाला. तीन चोरटे दुचाकीवरुन आले... रस्त्यावर चालत असणाऱ्या इसमाच्या डोक्याला बंदुक लावली... त्याच्या गळ्यातली सोनसाखळी हिसकावून चोरांनी पळ काढला...


हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय... सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.