कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव ते चव्हाणवाडी दरम्यान झालेल्या चारचाकी कार आणि मोटरसायकलच्या धडकेत एक महीला गंभीर जखमी झाली. तर दोघांना दुखापत झाली.. मात्र हा अपघात मोबाईल स्फोटामुळे झाल्याचं समोर आल आहे..कोल्हापूर जिल्ह्यातील नांदगावहून परखंदळे गावी स्विफ्ट गाडीतून जात असताना चालक योगेश चौगले यांच्या मोबाईलचा गाडीमध्ये स्फोट झाला.


3 जण जखमी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या भितीमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी विरूद्ध बाजूला जाऊन पोहाळे गावातून चव्हाणवाडीमधील पाहुण्यांकडे जाणार्‍या मोटरसायकला गाडीनं जोराची धडक दिली.


यावेळी  मोटरसायकल चालक ओंकार पाटील याच्यासह 3 जण जखमी झाले.


जखमींना कोल्हापूरच्या  सीपीआर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.