Kolhapur : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत (Idol Conservation) धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. अंबाबाईच्या (Ambabai) मूर्तीची गळ्या खालच्या भागाची झीज झाल्याची माहिती अहवालात (Report) देण्यात आली आहे. त्यामुळे मूर्तीचा चेहरा आणि चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करणं गरजेचं असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने हा अहवाल दिला आहे. या समितीने 8 पानी अहवाल न्यायालयात सादर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनात अवशेषांची झीज झाली असल्याचं तज्ञांचे मत असून संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी वापरले गेलेलं साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने मूर्तीला तडे जाऊन,थर निघत असल्याचं मत तज्ज्ञांनी आपल्या अहवालात नोंदवलं आहे. मूर्ती संवर्धन करण्यासाठी ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तळे मुजवता येणं शक्य असल्याचे मत देखील तज्ज्ञानी नोंदवला आहे. अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाबाबत झी 24 तास कडून पाठपुरावा करण्यात आला होता, त्यानंतर न्यायालयाकडून तज्ञ समिती नेमण्यात आली होती,आणि आता या समितीचा अहवाल समोर आला आहे.


मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धनाचा आरोप
अंबाबाईच्या मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धन केल्यानं मूर्तीचं रूप बदलल्याचा र्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर यांनी केला होता. देवीच्या बोटांची झीज झालीय. चेहऱ्यावरील भाव बदलले गेले आहेत. इतकंच नाही तर मूर्तीवरील अलंकार, कलाकुसर अस्पष्ट झाल्याचा गंभीर आरोपही मालेकर यांनी केला होता. एव्हढं सगळं होत असतानाही या सगळ्याकडे दुर्लक्ष होतंय, अशा परिस्थितीत भक्तांच्या मनाला क्लेश होत असतानाही त्यांनी मूग गिळून गप्प बसायचं का? असा सवालही यानिमित्तानं मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर यांनी केला.


कितीवेळा संवर्धन करणार?
दोन वर्षांपूर्वी अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. पण ती प्रक्रिया कुचकामी ठरली का काय? असा सवाल आता भक्त विचारत आहेत.