बदलापूर : रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच पावसाळी पर्यटन क्षेत्र बंद झाल्याने बदलापूरातील कोंडेश्वर कुंडाकडे पर्यटकांचा ओढा वाढला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्याभरात जवळपास 25 हजार पर्यटकांची विक्रमी गर्दी येथे झाली होती. त्यामुळे येत्या गटारीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी आणि धोका टाळण्यासाठी तहसिलदारांनी या भागात जमावबंदीचे आदेश दिलेत. 


21 जुलै ते 23 जुलैपर्यंत कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, व-हाडे, दहिवली आणि मळीचीवाडी येथील धरणक्षेत्र आणि धबधबा भागात तीन किलोमीटरपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत. त्यामुळे कोंडेश्वर कुंड ऐन मोसमात बंद राहणार आहे. तसेच पर्यटकांनी या काळात सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आलंय.