मुंबई : ख्रिसमसचा आनंद आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण आणि मध्य रेल्वेकडून हिवाळी स्पेशल ट्रेन चालविण्यात आल्या आहेत. मात्र या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून या गाडयांची प्रतीक्षा यादीही १५० च्या पुढे गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नविन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे कोकण आणी मध्य रेल्वेकडून हिवाळी विशेष ट्रेन चालविण्यात आल्या. मात्र या देखील गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून वेटिंग लिस्ट वाढलेली आहे. यामध्ये कोकणकन्या एक्स्प्रेस, मंगलोर एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेसचे, मांडवी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेसचे वेंटिग लिस्ट १५० च्या पुढे असल्याचे दिसून आले आहे. 


 गाडयांची वेटिंग लिस्ट


 गाडी                             ३१ डिसेंबरपर्यंत 


 कोकणकन्या एक्सप्रेस      १०१    


 मंगलोर एक्सप्रेस             ३१      


 तुतारी एक्सप्रेस              ११६    


 जनशताब्दी एक्सप्रेस      १६८    


 मांडवी एक्सप्रेस              ७५    


 तेजस एक्सप्रेस            ५८ (२९ डिसेंबर)