रत्नागिरी / सिंधुदुर्ग : नाताळ  आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागलीत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे पर्यटकांनी गजबजून गेलेत. कोकण आणि पर्यटनाचं नातं अलीकडे अधिक दृढ होत आहे. गोव्या पाठोपाठ आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंदी मिळू लागली आहे. मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या दिमतीला स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि माशाचं मस्त जेवण हे सारं पर्यटकांना भूरळ घालत असतं. त्यामुळे सहाजिकच अलीकडे सिंधुदुर्गमधील पर्यटकांची संख्या वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच रत्नागिरीचे किनारेही पर्यटकांनी गजबजून गेलेत. एमटीडीसीची सर्व रिसाँर्ट आणि हाँटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल झाली आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथले वॉटर स्पोर्ट्स आणि स्कूबा डायव्हींग. महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलय हे बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पर्यटकांची ही इच्छा इथं कोकणात पूर्ण होते. तारकर्लीच्या समुद्रतील रंगीत मासे, पाण वनस्पती आणि समुद्रातला तळ सारं काही पाहून पर्यटक हरखून जातात. 


नाताळ आणि नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी परदेशात तसेच गोव्यात जाण्याचे प्लान आखले जातात. मात्र यावर्षी पर्यटकांना कोकणाला जास्त पसंती दिलीय. परदेशात आणि गोव्यात ज्या सुविधा मिळतायत त्याच सुविधा आता कोकणात देखील मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे वळू लागलयेत.