खेड: काही काळ ठप्प झालेली कोकण रेल्वे पुन्हा मार्गस्थ झालीय. पण रेल्वेचे वेळापत्रक मात्र गडबडले आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्थानकानजिक सुकीवली गावानजिक मोठे दगड शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रॅकवर आले होते.


ट्रॅकमनचे प्रसंगावधान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गस्ती घालणाऱ्या ट्रॅकमनच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यानी प्रसंगावधान दाखवत दादर रत्नागिरी ही ट्रेन थांबवत दगड बाजूला हटवण्याचे काम सुरु केले. तीन तासानंतर मार्ग खुला झाला. पण यामुळे रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले आहे.


चाकरमान्यांना फटका


नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधननिमित्त कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना आज याचा फटका सहन करावा लागू शकतो.