नारायण राणेंची सुटका नाही तोपर्यंत कोकण शांत बसणार नाही - प्रमोद जठार
नारायण राणे यांना अटक केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मुंबई : नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. पण ही अटक कोणत्या कलमांअतर्गत झाली आहे. हे अजून स्पष्ट झालेलं नाही. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
100 कोटींची खंडणी घेणारे मोकळे फिरत आहेत. बलात्कार करणारे मोकळे फिरत आहे. त्यांना सरकार अटक करत नाही. अशी टीका भाजप नेते प्रमोद जठार यांनी केली आहे.
नारायण राणे यांना आता संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. त्यांना आज जामीन मिळतो का? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. महाराष्ट्रातील राजकारण गढूळ होत चाललं आहे. शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकमेकांवर दगडफेक करत आहेत.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधानांना याबाबत पत्र ही लिहिले आहे.