Mumbai Police: आपण हॉटेलमध्ये अनेक नवनवीन पदार्थांची चव चाखत असतो. त्यामुळे आपल्याला कधीकधी हे नवीन पदार्थ आवडतात अथवा आवडत नाहीत. कधी खूपच न आवडलेली डीश आपल्याला न राहवून पण ती अजिबात आवडली नाही हे सांगण्याचा मोह काही केल्या सुटत नाही. आपण सरळ तसं समोरच्याला (Non Veg Hotels Near Me) सांगून मोकळे होतो. आपल्याला एक डीश खूपच आवडली तर आपण त्याची स्तुतीही करत समोरच्या व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती न डीश बनवली आहे त्याचं कौतुकही करतो. परंतु नुकतीच अशीच एक घटना समोर आलीये जी वाचून तुमचा राग अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. (kopar khairane news new mumbai hotel owner fights with mumbai police for telling the owner about bad food) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई (New Mumbai) येथे नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्सा (Mutton Rassa) चांगला झाल नसल्याची तक्रार केल्यानं त्यातून झालेल्या वादातून एका चांगल्या नामवंत हॉटेलच्या हॉटेलचालकानं चक्क पोलिसांवरच हात उगारला आहे. याप्रकरणी कौपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या टोळीचा पोलिस सध्या तपास करत आहे. कौपरखैरणे इथल्या जगदंब हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. 


कोपरखेरणे पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी किरण साबळे आणि त्यांचे दोन सहकारी हे जेवायला म्हणून कोपरखैरणे येथील जगदंब (Jagdumb Hotel) या हॉटेलमध्ये गेले होते. हा प्रकारी गुरूवारी घडला. यावेळी त्यांनी हॉटेलमध्ये रस्सा मागवला होता. तो खाल्ल्यानंतर त्यांनी हॉटेल चालकाला (Hotel Owner) आपल्याला रस्सा आवडला नाही म्हणून सांगितले परंतु ते सांगितल्याचा राग अनावर झाला आणि हॉटेलचालकानं सरळ पोलिसांची हुज्जत घालायला सुरूवात केली. हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनी सरळ त्यांना ''खायचे असेल तर खा नाही तर खाऊ नका'', असं उद्धटपणे उत्तर दिले. 


 


हुज्जत घालता घालता त्यांनी सरळ पोलिस कर्मचाऱ्यांवर हात उगारला आणि मारहाण केली. पोलिस कर्मचाऱ्यांसोबत अशी घटना घडल्यानं परिसरातील नागरिकांना या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. आजकाल (Police) पोलिसांवरही अनेकदा हल्ले होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आणि संताप वाढला आहे. अशा लोकांवर वेळच्या वेळी कारवाई व्हावी अशी मागणी इथल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. 


तो हॉटेलचालक आहे तरी कुठे? 


ज्या पोलिसांशी अशा प्रकारे उद्धटपणे बोलण्याचा अतिशहाणपणा केला त्यांनी त्या हॉटेलचालकाला अशा वागण्याबद्दल जाब विचारला असता त्यांच्यात भांडणं सुरू झाली. बाताबाती झाली. मग हॉटेलचालकानं पोलिसांना मारहाण करायला सुरूवात केली. त्यांनी हॉटेलचं शटर बंद केलं आणि आतमध्ये त्यांना डांबून ठेऊन त्यांना जोरात मारहाण केली. यामध्ये तिघेही पोलीस जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कोपरखेैरणे (Koparkhairane) पोलिस ठाण्याच्या हॉटेलमालकावर अक्षय जाधव आणि इतर तिघा हॉटेल कर्मचाऱ्यांवर गुन्हा तर दाखल केला आहे परंतु हे चौघंही जण सध्या फरार आहेत आणि पोलिस  त्यांचा शोध घेत आहेत.