नगर : कोपर्डीतल्या निर्भयाच्या मारेक-यांना काय शिक्षा होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आज सकाळी तिन्ही दोषींना कोर्टात हजर करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी नितीन भैलुमेच्या वकीलांनी तो तरुण आहे. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं त्याला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी विनंती कोर्टासमोर केली. कोर्टानं भैलुमेला बोलण्याची संधी दिली.


त्यातही भैलूमेनं निर्दोषत्वाचा दावा केला आहे. दरम्यान दोषींना फाशीच दिली जावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होतेय. आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यांची बाजू मांडतील. आरोपींवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये दोषींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. 


कोपर्डी गावातल्या नववीत शिकणा-या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना १३ जुलै २०१६ रोजी घडली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रातील सामाजिक - राजकीय वातावरण ढवळून निघाल होतं. देशभरात निघालेले मराठा मूक मोर्चे मुक मोर्चे त्याचाच भाग होते.