अहमदनगर : संपूर्ण देशभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीतल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा फैसला आज होणार आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. 


दोषी की दोषमुक्त, आज ठरणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटकेत असलेल्या तीन आरोपींना आज दोषी ठरवलं जाईल, की दोषमुक्त केलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 


संपूर्ण महाराष्ट्रात होती संतापाची लाट


१३ जूलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अलपवयीन मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्याच नव्हे, तर संपुर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. 


विशेष म्हणजे असे अमानवी कृत्य करणारा मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला पोलिसांनी तातडीने १ दिवसात म्हणजे १४ जुलै रोजी दिवसात अटक केली. 


खटल्यात उज्ज्वल निकम सरकारी वकील


आरोपीची चौकशी करत पोलिसांनी त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्या संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या दोन आरोपींना देखील गजाआड केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत.