लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात कंटेनर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चेंदामेंदा झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ॲपे रिक्षा प्रवाशांना घेऊन झगडे फाट्यावरून कोपरगाव कडे जात असताना पगारे वस्ती जवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन या कंटेनरने दोन मोटरसायकल स्वरांना देखील चिरडले आहे ते देखील गंभीर जखमी झाले आहेत.


या रिक्षात एकूण बारा जण बसले होते. अपघातानंतर रिक्षाचा चेंदामेंदा झाला होता, रिक्षात बसलेल्या प्रवाशांचं सामान आणि विद्यार्थ्यांची दप्तरं सर्वत्र विखुरली होती. कंटेनर चालक पळून जात असातना झगडे फाट्यानजीक नागरिकांना त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. 


अपघातात राजाबाई साहेबराव खरात (60, रा. चांदेकसारे तालुका कोपरगाव), आत्माराम जमानसा नाकोडे(65, रा. वावी तालुका सिन्नर), पूजा नानासाहेब गायकवाड (20, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (20, रा. चांदेकसारे तालुका कोपरगाव), शैला शिवाजी खरात (42), शिवाजी मारुती खरात (52, दोघेहि रा. श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. 


जखमींना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.