कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमात आज २०२वा शौर्यदिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळीच विजयस्तंभाला अभिवादन केलं. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं. कोरेगाव भीमामधील परिस्थितीसंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत इथं येणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढल्याचं ते यावेळी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आले आहेत. अनुयायांची संख्या लक्षात घेता याठिकाणी अनुयायांच्या सोईसाठी प्रशस्त पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृह, रुग्णवाहिका अशा उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. तर सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सीसीटीव्ही आणि ड्रोनचा वापरही करण्यात येणारे. सोशल मीडियावरही पोलिसांची नजर असणार आहे.


जाणून घ्या कोरेगाव-भीमामध्ये का साजरा केला जातो शौर्यदिन


गर्दी होणाऱ्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे एक जानेवारीला पोलीस आणि अन्य अत्यावश्यक विभागांसाठी हॉट लाइनची व्यवस्था करण्यात आली आहेय. त्याशिवाय येणाऱ्या भाविकांना 'इमर्जन्सी कम्युनिकेशन व्हॅन'ची सुविधा पुरवण्यात येणार आहे.


गर्दीत काही गोंधळ होऊ नये आणि अफवा पसरू नयेत यासाठी या परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. इंटरनेट सेवा बंद ठेवणे हा प्रशासनाचा उद्देश नसून अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.