मुंबई : Koregaon Bhima Inquiry Commission summons Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भीमा कोरेगाव प्रकरणी साक्ष नोंदवण्यात येत आहे. भीमा कोरेगाव इथं घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर सह्याद्री अतिथीगृहात शरद पवार पवार साक्ष देणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनावणीत हजर राहण्यासाठी पवारांना देण्यात आलेलं हे तिसरे समन्स आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी शरद पवारांनी आपले अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही नुकतंच आयोगापुढे सादर केलं होतं. तसेच, यापूर्वी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते. पण काही  ते हजर राहू शकले नाहीत. दरम्यान, आज भीमा कोरेगाव प्रकरणी ते आपली साक्ष नोंदवण्यासाठी उपस्थित राहीले आहेत.


कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने  शरद पवार यांना आज आणि उद्या साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावले आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे एन पटेल यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय आयोग 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा भागात झालेल्या हिंसाचाराच्या कारणांची चौकशी करत आहे, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाला होता आयोगाने याआधी पवार यांना साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावले होते.



परंतु 21 फेब्रुवारी रोजी पवार यांनी मुंबईतील आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली आणि तपशीलवार माहितीसह अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याचे सांगत त्यांची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती.