विकास भोसले,  सातारा प्रतिनिधी  :   सातारा जिल्ह्यातील कोयनानगरच्या महाप्रलयंकारी भूकंपाला महराष्ट्रातील या भूकंपाला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 धरणीकंपात तब्बल १९० जणांचा बळी गेला तर 50 गावातील हजारो लोक जायबंदी झाली. भूकंपाच्या या घटनेला 50 वर्ष झाली तरी आजही त्याच्या कटू आठवणी कायम आहेत.
 
 काळरात्र 


11 डिसेंबर 1967... कोयनानगरवर उष:काल होता होता काळरात्र आली.. गावकरी साखरझोपेत असतना पहाटे 4वाजून 21 मिनिटांनी या भागात महाप्रलंकारी भूकंप झाला.. ज्याची तीव्रता होती 6.7 रिश्टर स्केल इतकी होती.  धाब्याची घरं पत्त्यासारखी कोसळली आणि साखर झोपेतच अबालवृद्ध त्याखाली गाडली गेली.. डोळे उघडण्याचीही कुणाला संधी मिळाली नाही.. 190 जणांचा बळी गेला... हजारो लोक कायमचे जायबंदी झाले.. लाखो बेघर झाले.. सूर्योदयानंतर डोळ्यासमोर उभा होता आपल्याच माणसांच्या मृतदेहांचा ढिग आणि उध्वस्थ झालेला संसार...
जीवाच्या अकांतानं ढिगारे उपसत गावकरी आपल्या नातलगांना शोधत होते.. या भूकंप ग्रस्थांच्या आठवणी ऐकताना आजही अंगावर शहारे येतात..



भूकंपानंतर शासनाकडून मदत आली...  भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलं.. त्यांना नोकरी आणि शिक्षणासाठी दाखले देण्यात आले.. मात्र हे दाखले केवळ दाखवण्यापूरते राहिले.. 



भूकंपाच्या या घटनेला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.. या पन्नास वर्षात शासनान दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय.. या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी हे भूकंपग्रस्त आज कँडलमार्च काढणार आहेत.. भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत..



महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणामुळे राज्याच्या वीज आणि पाण्याचा प्रश्न मिटला.. मात्र याच कोयना परिसराला आतापर्यंत 1 लाख 18 हजार 518 भूकंपाचे धक्के बसले.. यातील नऊ धक्के हे पाच रिश्टर स्केल तीव्रतेचे होते.. भूकंपानं इथल्या अनेकांचं आयुष्य उध्वस्त केलंय.. पण अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही..