Horrible Accident : जीव मुठीत घेऊन पळाला शेवटी मृत्यूनं गाठलंच
शेवटी जे व्हायचं होत तेच घडल... तो मृत्यूच्या तावडीत सापडला. पालघर येथील मामाच्या गावाजवळ ही भयानक घटना घडली आहे.
पालघर, झी मीडिया, हर्षद पाटील : असं म्हणतात ना शेवटी जे व्हायचं ते घडतचं. असाच धक्कादायक प्रकार पालघरमध्ये (Palghar) घडला आहे. स्वत:चा बचाव करण्यासाठी तो पळाला पण शेवटी त्याचं अपघाती निधन झालं. या घटनेमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे (terrible accident).
पालघर जील्हातील दगड खाणींमध्ये भूसुरंग करण्यास आलेल्या ट्रॅक्टर चालकाचा पळून जाताना अपघात होऊन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बोईसर पूर्वेस असलेल्या गुंदले येथे ही घटना घडली आहे. अवैद्य दगड खाणींवर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकल्याने ट्रॅक्टर पळून जाताना ही घटना घडली आहे.
पळून जाताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर पटली झाले आणि त्या खाली येऊन चालकाचा मृत्यू झालाय. चालक मूळचा राजस्थानमधील असल्याची प्राथमिक माहिती येत आहे .दरम्यान बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
बोईसर पूर्वेकडील मामाच्या गावालगत ही घटना घडली. येथील दगड खाणीतुन बाहेर निघत असताना उंचावरून ट्रॅक्टर पलटी होवून ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. 6 जानेवारी रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर चालकास रुग्णालयात नेत असताना पुन्हा एका वळणावर समोरून आलेल्या वाहनामुळे ट्रॅक्टर मोरीत पडला या घटनेत मात्र त्याचा मृत्यू झाला.
श्यामलाल श्यामत भोई (वय 22) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. श्यामलाल हा मुळचा राजस्थानच्या बनेडा गावातील राहणारा आहे. तो खदानीत दगड ड्रिल (कॉम्प्रेसर) करण्याचे काम करत होता. गुंदले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या करवेले येथे संतोष कोरडा यांच्या मालकीच्या जागेत दगड उत्खनन करण्यासाठी भाडेतत्त्वावर दगड खाण देण्यात आली आहे.
याठिकाणी श्यामलाल हा ड्रीलिंग करून खादानीतून बाहेर निघत असताना रस्त्याच्या अंदाज न आल्याने खदानीत ट्रॅक्टरसह पंधरा फुटांवरून खाली पडला. तातडीने त्यास खदान चालकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टरखाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढले यात त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. रुग्णालयात नेत असताना पुन्हा घडलेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना पोलिसांना कळताच पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर, पोलिस हवालदार शेख उपस्थित होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.