मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे.  यंदा महाराष्ट्रात एकूण 65.1 टक्के इतकं मतदान झालं असून 1990 नंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे. यातही महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असून लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे महिलांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचा दावा महायुतीचे नेत करत आहेत. त्यामुळे वाढलेलं महिलांचं मतदान हे महायुतीला वरदान ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली. दर महिना 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केले. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार का, याविषयी बरीच चर्चा सुरू होती. या निवडणुकीत महिलांच्या मतदानाचा टक्का वाढलेला पाहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचा दावा महायुतीचे नेते करत आहेत. 


मतदानाची टक्केवारी : 


मुंबई शहरातील 10 विधानसभा मतदारसंघात एकूण 52.69 टक्के मतदान झालं. 
महिलांचं प्रमाण - 53.42 टक्के झालं. 
पुरुषांचं प्रमाण - 51.99 टक्के झालं. 


हेही वाचा : Maharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी


 


लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीतला अत्यंत कळीचा मुद्दा राहिलाय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई रंगली होती. या निवडणुकीत मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीत महिलांचा मोठा सहभाग होता.  पुरुषांच्या तुलनेत जवळपास दीड टक्के महिला मतदान जास्त झालं. राज्यभरात विविध ठिकाणी मतदान केंद्राबाहेर महिलांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. महिलांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान केलंय. महायुती सरकारनं महिलांसाठी अनेक योजना आणल्या. त्यामुळे महिलांनी महायुती सरकारला आशीर्वाद दिल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. लाडकी बहीण योजनेवरून प्रचंड चर्चा झाली. निवडणुकीत महायुती सरकारनं या योजनेवरून जोरदार प्रचार केलाय. आता राज्यातल्या लाडक्या बहिणींनी महायुतीतल्या भावांना मतांचं दान दिलंय का, हे 23 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.