लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट; 31 ऑगस्टनंतर आता महिलांना...
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आधी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट होती शेवटची मुदत होती. अधिकाधिक महिलांना लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्र सरकार यासंदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 35 वयोगटातील महिला आणि मुलीसाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना 1500 रुपये मासिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्य आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक अकाऊंट डिटेल्स, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला, मतदान कार्ड हे कागदपत्र आवश्यक आहेत. 14 ऑगस्टपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
काँग्रेसची कोर्टात धाव, सरकारचं उत्तर
काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. "ही योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत. मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू. या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ही योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत. मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू. या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत, असे आवर्जून नमूद केले.
दरम्यान दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे. "राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच सांगा या योजना बंद करायच्या का?," अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांना केली.
"राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच सांगा या योजना बंद करायच्या का?," अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांना केली.