विदर्भातील एक लाख भूमिधारी शेतकरी होणार जमिनीचे मालक
विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी...
नागपूर : विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी...विदर्भातील भूमिधारी शेतक-यांच्या जमीनी कोणतंही शुल्क न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये ही माहिती दिली.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळं विदर्भातील जवळपास एक लाखाहून अधिक भूमीधारी शेतक-यांना लाभ होणार आहे.या शेतक-यांना केवळ जमीन कसण्याचा अधिकार होता.
जमिनीची मालकी राज्य सरकारकडं होती. आता या जमिनीच्या सातबा-यावर या शेतक-यांच्या नावाची नोंद होणार आहे. दरम्यान या योजनेची संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.