लातूर : सत्ताधारी भाजपतील लातूर ग्रामीणमधले भाजपचे वजनदार नेते आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय रमेश कराड यांनी भाजपाला रामराम ठोकलाय. ते राष्ट्रवादीकडून  विधानपरिषद निवडणूक लढवणार आहेत. उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी ते अर्ज दाखल करणार आहेत. 


भाजपचे रमेश कराड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपला जोरदार धक्का दिला आहे,पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आणि भाजप नेते रमेश कराड यांना राष्ट्रवादी मध्ये प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली आहे,कराड यांच्या प्रवेशाची फिल्डिंग लावून धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा ला मोठा धक्का दिला आहे,कराड यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी ने भाजप समोर तगड आव्हान उभे केले आहे.


भाजपने डावलल्याने पक्षत्याग


रमेश कराड हे 12 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपवासी झाले होते,गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे त्यांना २००९ आणि २०१४ मध्ये लातूर ग्रामीण मतदार संघातून भाजपने उमेद्वाररी दिली होती,मात्र दोन्ही वेळा ते पराभूत झाले,कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ म्हणून परिचित आहेत. स्थानिक स्वराज्य संघातून त्यांनी भाजपला उमेदवारी मागितली होती मात्र भाजपने सुरेश धस याना पसंती दिल्याने कराड नाराज झाले,नाराज कराड याना गळाला लावत धनंजय मुंडे यांनी आज त्यांना राष्ट्रवादी मध्ये प्रवेश दिला,उस्मानाबाद येथे धनंजय मुंडे,जीवनराव गोरे,राणा जगजितसिंह पाटील,अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत कराड यांचा प्रवेश आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोहळा पार पडला


कराड यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देवीं धनंजय मुंडे यांनी भाजपलाच नव्हे तर बहीण पंकजा मुंडे यांना देखील जबर हादरा दिला आहे,धस हे बीड जिल्ह्यातील असल्याने या निवडणुकीत पंकजा यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे,त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला बहीण विरुद्ध भाऊ असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.