रत्नागिरी : जिल्ह्यात आज, उद्या संचारबंदी राहणार आहे. ( Curfew in Ratnagiri) जिल्ह्यात गुरुवारपासून अनलॉक (unlock) सुरू झाला असून, शनिवार आणि रविवारी संचारबंदी आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा मात्र, सुरू राहतील आहेत. दोन दिवस संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. गेले दोन दिवस रत्नागिरीत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उडाली होती. त्यातच अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.


अतिवृष्टीचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात चार NDRF च्या टीम दाखल झाल्या आहेत. त्यातील एक टीम चिपळुणात तैनात करण्यात आली आहे. आज या टीमने शहरातील नदीपत्राची केली पहाणी केली ही टीम दोन दिवस चिपळुणात तैनात राहणार आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. पण, आता मात्र रत्नागिरी शहरासह आसपासच्या गावांमध्ये आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची मुसळधार आहे. शिवाय, काही ठिकाणी ढगांचा गडगडाट होत आहे. 


NDRF च्या चार टीम दाखल


रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर NDRF च्या चार टीम जिल्ह्यात दाखल झाल्यात. यापैकी एका टीमने आज चिपळुणातील दरडग्रस्त भाग आणि वाशिष्ठी नदी पात्राची पाहणी केली. यावेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर वैभव विधाते यांनी NDRF च्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. चिपळुणातील गोवळकोट, मुरादपूर, पेठमाप, बहादूर शेख नाका, बाजारपेठ, शिववनदी या भागाची पाहणी करण्यात आली आहे.